औरंगाबाद- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विविध कामांच्या शुभारंभासाठी शहरात येत आहेत. यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संकुलासह मनपा हद्दीतील १०० कोटीतून होणाऱ्या ३० रस्त्यांच्या शुभारंभ ते करणार आहे. सकाळी त्यांचे आगमन होणार असून ते फुलंब्रीला हॅलीकॅप्टरने एका कार्यक्रमाला जाणार आहे. तो कार्यक्रम झाल्यावर दुपारी शेतकऱ्यांसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी तयार केलेल्या संकुलाचा शुभारंभ ते करतील. त्या नंतर एमजीएम मध्ये भाजयुमोच्या कार्यशाळेच्या समारोपाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत. टी व्ही सेंटर येथे मनपा हद्दीतील ३० रस्त्यांच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाला ते उपस्थितीत राहतील. तेथून ते विमानाने नागपूर कडे प्रयाण करतील अशी माहिती उपमहापौर विजय औताडेंनी पत्रकार परिषदेत दिली.
महापौर घालणार मुख्यमंत्र्याना साकडे
शहराचा विकास झपाट्याने व्हावा यासाठी महापौरांनी चांगलाच पुढाकार
घेतला आहे. महापौर पदाधिकारी मिळून
मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करणार आहे. यात शहरातील प्रलंबित विकासाचे मुद्दे या निवेदनात असणार आहे. यात
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मारक
संबंधित निधी,
सातारा देवळाई साठी १००० कोटी रुपये
मुख्यमंत्र्यांच्या स्पेशल हेड मधून तरतुदी साठी, शासनाकडे प्रलंबित असलेले १०९ कोटी रुपये लवकरात लवकर मिळावे
यासाठीचे साकडे निवेदनातून मुख्यमंत्र्यांना घालणार असल्याची माहिती महापौर
नंदकुमार घोडेले यांनी पत्रकार परिषदेत दिली.